John Cena ने शेअर केला भारतीय क्रिकेटपटूचा फोटो | Lokmat News

2021-09-13 580

जगभरात क्रिकेट चे चाहते खूप आहेत. WWE मध्येही क्रिकेटचे चाहते आहेत. WWE मध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेला रेसलर जॉन सीना तर क्रिकेटचा खास चाहता. क्रिकेटवरचे प्रेम व्यक्त करत सीनाने चक्क एका भारतीय खेळाडूचे पोस्टर शेअर केले आहे. हा खेळाडू कोणी दुसरा तिसरा नसून राहुल द्रविड आहे.
जॉन सीनाने राहुल द्रविडचे जे पोस्टर आपल्या ट्विटर हॅंडलवर जो फोटो शेअर केला आहे त्यावर लिहीले आहे, आपण बदल्यासाठी खेळत नाही. आपण इज्जत आणि सन्मानासाठी खेळता. ही पोस्ट सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली आहे. इतकी की, बॉलिवूड अभिनेता वरून धवनेही हा फोटो लाईक केला असून, त्याखाली प्रतिक्रिया लिहिली आहे. 'राहुल खराखूरा हिरो आहे.सीनाच्या जीवनावर आधारीत "Ferdinand " नावाच चित्रपट येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनामध्ये सीना सध्या व्यग्र आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सीना ऑस्ट्रेलियातही पोहोचला. या वेळी त्याने क्रिकेटटर शेन वॉटसनसोबत संवाद साधला आणि त्याच्याकडून क्रिकेटचे धडेही घेतले.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires